तुळजापूर - तालुक्यातील देवसिंगा तुळ येथे अवैध धंद्यांना ऊत आल्याने  ग्रामस्थ ञस्त झाले आहेत. या अवैध धंद्याचा ञास महिला व शालेय विध्यार्थांना बसत असल्याने  अवैध धंदे बंद करण्याची मागणी होत आहे.

तुळजापूर नळदुर्ग रस्त्यावर देवसिंगा तुळ येथे  हे 1500 लोकसंखेचे गाव आहे. या गावात पाटी पासुन जे अवैध धंदे सुरु ते गावापर्यत भरदिवसा चालु आहे. गावचे ग्रामदैवत असणाऱ्या महादेव मंदीरा लगत असणाऱ्या सभागृहात राञदिवस डाव पत्ते खेळणे चालु असते. सभागृहाच्या भिंती गुटखा, मावा, पानाच्या पिचक-यांनी रंगुन गेल्या आहेत. सध्या हे सभागृह जुगार अड्डा बनला आहे. तसेच गावात जिल्हा परिषद शाळे बाजुला व अनेक ठिकाणी अवैध दारु विक्री जोमात सुरु असुन,दारुड्यांचा ञासाने महिला वर्ग ञस्त झाल आहे. तरी या भागात पोलिसांनी गस्त वाढवुन अवैध धंदे वाल्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ञस्त ग्रामस्थांमधुन केली जात आहे.

 
Top