तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रावण सोमवार रक्षाबंधन असे महत्त्वाचे धार्मिक सण असतानाही सोमवारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी बहीणी चक्क सोमवार सकाळ पासुन बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करीत असल्याने भावा पेक्षा मुख्यमंत्रीच महिलांचा सर्वाधिक लाडका भाऊ या रक्षाबंधनला बनल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
मागील दोन दिवसांपासून राज्य शासनाकडून 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे तीन हजार रूपये जमा केले आहेत. पैसे जमा झाल्याचा भ्रमणध्वनीवर संदेश येताच महिला पैसे काढण्यासाठी बँकेकडे धाव घेत आहेत. यामुळे पैसे काढण्यासाठी मुख्यमंञ्यांच्या लाडक्या भगिनी पैसे काढणे व केवायसी साठी बँकेत गर्दी करीत आहेत.
बँकेच्या सध्या अनेक महिला चौकशीकरण्यासाठी व बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी सुध्दा गर्दी करीत होत्या. रक्षाबंधन पुर्वी पैसे काढण्यासाठी
महिला बँकेतील पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत. मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे पैसे देण्याच्या प्रक्रियेचा प्रचंड ताण कर्मचाऱ्यांवर पडत आहे. त्यांना दुसरे काही काम करणे ही अशक्य बनले आहे. राज्य शासनाने लाडक्या बहिणींसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली असतानाही महिलांच्या गर्दीमुळे बँकेत कर्मचाऱ्यांची मात्र डोकेदुखी वाढत आहे. येथील बँक ऑफ इंडीया शाखेत दोन दिवसांपासून लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थीनी बँक भरुन गेली आहे. लाडक्या बहीण योजने बाबतीत अनेक वक्तव्य बाहेर येत असल्याने बंद होण्यापुर्वी पैसे काढण्यासाठी बँकेत महिला गर्दी करीत आहे.