तुळजापूर (प्रतिनिधी)- भूजल व्यवस्थापन काळाची गरज आहे. असे प्रतिपादन पाणि व माती व्यवस्थापन विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर उपकेंद्र परिसर धाराशिव डॉ. नितीन पाटील यांनी केले. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे युनिसेफ, स्मार्ट रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, रोटरी क्लब तुळजापूर व तुळजाभवानी महाविद्यालयाच्या ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने युवा जलसंवर्धक अभियान राबविण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, आज युवक व युवतींचे पाणी बचतीचे आद्य कर्तव्य आहे.  प्रत्येक वस्तुंच्या निर्मितीसाठी पाणी गरजेचे आहे. आपल्या जिल्ह्यात सरासरीच्या 700 मिली मीटर एवढा एकुण पाऊस पडतो.  आपल्या घराच्या छतावर 70 हजार लिटर पाणी पडते पण हे पाणी साठवणे गरजेचे आहे. यासाठी जल जमीन, जंगल, जनावरे, जनसंख्या या पंचजकारांचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. जमीनीची माती जपणे गरजेचे आहे. आपल्या कडे किमान 33 टक्के जंगल असणे गरजेचे आहे.  विशेष म्हणजे समुद्राच्या दिशेने जाणारे पाणी अडवणे आवश्यक असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. जीवन पवार जिल्हा समन्वयक युवा जलसंवर्धक अभियान डॉ.विनोदकुमार वायचळ, प्राचार्य तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव डॉ.व्ही व्ही माने, अध्यक्ष रोटरी क्लब तुळजापूर प्रशांत अपराध, स्टेशन हेड रेडिओ तेरणा संजॉय मैंदर्गे, अभिजित कदम यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.  सूत्रसंचालन डॉ. आनंद मुळे यांनी तर आभार संतोष लोखंडे यांनी मानले. सदर प्रसंगी ग्रीन क्लब समन्वयक डॉ. दयानंद हाके यांच्या सह सर्व शिक्षक तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top