परंडा (प्रतिनिधी) - वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तानाजी भिमराव बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली परंडा शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सोबत एक महत्वपूर्ण बैठक रविवार दि.18 ऑगस्ट रोजी येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. 

या बैठकीत विशेष करून ग्रामीण भागातील लोकांच्या आडी आचडणी समस्यांवर चर्चा करण्यात आली तसेच अनेक भागात व गावात पिण्याच्ये पाणी, लाईट, शोचालय, रस्ते, समस्यांनभुमी आदी विषयावर चर्चा करण्यात आली वरिल समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भव्य आसा एल्गार मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा डॉ.बाळासाहेब आंबेडकर जे उमेदवार देतील त्यांना निवडून आणू असे एकमताने बैठकीत ठरविण्यात आले.

या बैठकीला दिपक पोळ,महेंद्र सरवदे, मंगेश भोसले, प्रदीप परिहार,प्रमोद पोळ ,जितेंद्र सरवदे, जिवन पोळ, मछींदर कांबळे, चंद्रहास बनसोडे, समाधान भोसले, युवराज भोसले, अनिल कंदील, शंकर माळी रामदास शिंदे, हिरालाल ओव्हाळ,अमोल ओव्हाळ, हानुंमत शिंदे, राहुल अ. बनसोडे, संदीप बनसोडे, शिवाजी बनसोडे, विजय पोळ, संदीप चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, बळीराम गायकवाड, नितीन भोसले, आणा भोसले, भिमा भोसले, अविनाश चव्हाण, सतिश चव्हाण, कुणाल बनसोडे, अय्युब जिनेरी, शुक्राचार्य वाडेकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top