कळंब (प्रतिनिधी) - शहरातील प्रभाग क्रमांक 3 सावरगाव पुनर्वसन भागात अस्वच्छता पसरली आहे रस्त्यावर पाणी येत असून नाल्या तूंबल्या आहेत यामुळे सर्वत्र अस्वछता पसरली आहे घाणीचे साम्राज्य झाले आहे या गंभीर बाबीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष का दिसत आहे.
सततच्या रिमझिम पावसामुळे जागो जागी पाणी जमा होत असून परिसरातील गटारी तुंबल्या आहेत डेंगू मलेरियाने परिसरातील दवाखाने तुडुंब झाले आहेत. त्यात बाहेर अस्वच्छता त्यामुळे येथील नागरिक कमालीचे वैतागले आहेत. लेखी व तोंडी सांगून देखील नगरपरिषद काहीही उपाय करत नसल्याचे आरोप येथील नागरिकांनी केला आहे. नगर परिषदेने तात्काळ या भागाची स्वच्छता करून या भागात कचराकुंडीची व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. तसेच या भागात दररोज घंटागाडी यावी अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.