धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिवचे सुपुत्र, पुणे येथील सहकार नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांची सोलापूर येथील पोलीस आयुक्तालयात  सहायक पोलीस आयुक्तपदी पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्याचे सुपूत्र  सुरेंद्र गजेंद्र माळाळे हे सहकार नगर, पुणे येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पहिल्याच परिक्षेत ते पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवडले गेले. सन 1995 मध्ये ते पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झाले होते. त्यांनी आतापर्यंत  नागपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजी नगर, सीआयडी गुन्हे शाखा, जालना पोलीस प्रशिक्षण, जालना स्थानिक गुन्हे शाखा आदी ठिकाणी आपले कर्तव्य बजावले आहे.

सुरेंंद्र माळाळे यांना आतापर्यंत महाराष्ट्र शासनाचे स्वातंत्र्याचे 50 वर्षे पदक, खडतर सेवा पदक, अंतर्गत सुरक्षा पदक, डी.जी इन्सिगनिया अवॉर्ड, स्वातंत्र्याची 75 वर्षे पदक, उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून पोलीस महासंचालकांचे प्रशस्तीपत्र, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोकडून उत्कृष्ट कार्याचे प्रशस्तीपत्र, 2022 चे राष्ट्रपती पदक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 
Top