तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेत्र तुळजापूर शहरात ड्रग्ज येत असेल तर घेणाऱ्या ऐवजी सप्लायर पकडुन त्याचावर कारवाई करणार. सप्लायरला सोडणार नाही. असे प्रतिपादन उपविभीगीय अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
येथील पोलिस ठाण्यात पत्रकारांशी संवाद साधताना देशमुख म्हणाले की, ड्रग्ज प्राशन करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी मर्यादा आहे. एक तर त्याच्याकडे कमी प्रमाणात ड्रग्ज असते. ड्रग्ज प्राशन करणाऱ्या पेक्षा सप्लाय करणाऱ्यांवर कारवाई होणे गरजे आहे ते आम्ही निश्चित करणार आहे. तिर्थक्षेत्र तुळजापूर शहरात वाढत्या चोऱ्यांच्या घटने बाबतीत बोलताना म्हणाले कि, पोलिस रात्री पेट्रोलिंग करीत असुन सायरन सिस्टीम सुरु केली आहे. तसेच शहरात सध्या सर्वत्र 57 सीसीटीव्ही कार्यरत आहेत. उर्वरीत सीसीटीव्ही दुरुस्ती पत्र नगर परिषदेला दिले आहे. तिर्थक्षेत्री वेश्याव्यवसाय बाबतीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच शहरात बेभाव पैसे रिक्षावाले घेतात यात व अनाधिकृत रिक्षा बाबतीत बोलताना म्हणाले कि, शहरातील सर्व रिक्षांची तपासणी करावी लागेल व या बाबतीत आरटीओला कळवु असे यावेळी म्हणाले. जेष्ट नागरिकांचा मोबाईल चोरी पार्श्वभूमीवर बोलताना म्हणाले की, बंदोबस्त वाढवावा लागेल व तक्रार आली तर निश्चित कारवाई केली जाईल अशी ग्वाही यावेळी दिली.