धाराशिव (प्रतिनिधी)- साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त डीजेचा खर्च टाळून लहुजी प्रतिष्ठानच्या वतीने नागनाथ मूकबधिर महाविद्यालय खानापूर येथे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य नारळ पाणी, शुद्ध पाणी करण्याची मशीन हे विद्यार्थ्यांसाठी जयंतीनिमित्त भेट देण्यात आले. तरी या कार्यक्रमात उपस्थित लहुजी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष काकासाहेब पेटे तसेच जयंती अध्यक्ष सुरज शहापालक व उपाध्यक्ष सचिन धाकतोडे सचिव गणेश मगर, रवी झोंबाडे, सचिन पेठे, श्रीकांत लोकरे, शंकर देडे, विजय देडे, किरण झोंबाडे, रतन पेठे, आकाश पेठे, संजय पेठे, शंकर कसबे व लहुजी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ही उपस्थित होते.