तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील भातंब्री गावात घाणीचे साम्राज्य पसरल्याने साथ रोग पसरण्याची शक्यता निर्माण आहे. हे घाणीचे साम्राज्य दूर करण्याची मागणी होत आहे.

तिर्थक्षेञ तुळजापूर ते अक्कलकोट  रस्त्यावर भातंब्रा गाव आहे. गाव लहान असुनही येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचरा कुंडी  कच-याने भरुन रस्त्यावर  येत आहे. याच कच-यातुन येमाई देवी मंदीराकडे जावे लागत असल्यामुळे  या घाणीचा ञास भाविकांना होत आहे. गावातील नाल्यांची दुरावस्था झाली आहे. सिमेंट रस्त्यांची वाट लागली आहे. गावातुन ठराविक भागात सिमेंट रस्ते आहेत. नाल्या नसल्यामुळे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. त्यामुळे स्वच्छतेसाठी आलेला पैसा कुठे गायब होता असा सवाल ग्रामस्थांमधुन विचारला जात आहे. तरी गाव रोगराईच्या साथीत जाण्याआधीच स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

 
Top