तुळजापूर (प्रतिनिधी) -कृष्णा खोरेचे पाणी अद्याप आलेले नाही त्यासाठी निधीची तरतूद नाही. महायुती सरकाला घोषणाबाज सरकार असल्याने आगामी काळात  एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असे आवाहन बोरगाव  येथे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

त्यावेळी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष सिद्धराम आप्पा मुळे, जळकोटचे माजी सरपंच अशोक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश चव्हाण, दिलीप सोमवंशी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शहबाज काझी उपस्थित होते. यावेळी बोलताना म्हणाले की, नंदगाव भागातील साठवण तलाव, गाव जोडणारे रस्ते, महावितरणशी संबंधित कामे झाल्यामुळे या भागाचा कायापालट झालेला आहे. अतिशय दुष्काळी असलेला तालुका अशी ओळख असलेला हा भाग सध्या बागायतदार झालेला आहे. याबरोबरच या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संकुल उभारण्यात आले आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध झाली आहे. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून नाला बंडींग, गाव रस्ते, शेत रस्ते, गावोगाव जोडणारे रस्ते असे मोठ्या प्रमाणात या भागात निर्माण झाले. त्यामुळे दळण वळणाची सोय झालेली आहे. महायुतीच्या सरकारने फक्त घोषणा केलेली आहे. प्रत्यक्षात कुठेही काम केलेले नाही. कृष्णा खोरेचे पाणी अद्याप आलेले नाही. त्यासाठी निधीची तरतूद नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी सिद्राम आप्पा मुळे, शहबाज काजी, प्रकाश चव्हाण, अशोक पाटील, दिलीप सोमवंशी यांनी मनोगत मांडले. यावेळी दशरथ काटे, महादेव काळे, सिंदगावचे श्रीमंत चव्हाण, धनंजय पाटील, अप्पाशा कामशेट्टी, विजयकुमार मोरे, बसवराज पाटील, उमाकांत कदम, संजय पवार, गणेश बिराजदार, दत्तात्रय सुरवसे, शरणाप्पा कबाडे, अमोल नरवडे, अभिजीत चव्हाण, सलगरा मंडीचे, रामचंद्र थिटे, शाम सुरवसे, शेखर कलशेट्टी, आप्पा मुळे, रौफ सय्यद, डॉ. इस्माईल शेख, सुधीर गायकवाड, श्रीमंत बनसोडे यांचे सह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 
Top