धाराशिव (प्रतिनिधी)- भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील काँग्रेस कार्यालयात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.

जिल्हा काँग्रेसचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रशांत पाटील, उपाध्यक्ष डॉ.स्मिता शहापूरकर, सरचिटणीस अशोक बनसोडे, तालुका अध्यक्ष विनोद वीर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, ज्येष्ठ नेते शहाजी मुंडे, सुनील बडूरकर, मानवाधिकार विभागाचे प्रदेश सरचिटणीस प्रभाकर लोंढे, सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रेम सपकाळ, संजय गजधने, विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष कफिल सय्यद, सुभाष हिंगमिरे, स्वप्नील शिंगाडे, धवलसिंह लावंड, सौरभ गायकवाड आदी उपस्थित होते. राजीव गांधी यांचा जन्मदिन “सद्भावना दिवस“ म्हणून साजरा केला जातो.

 
Top