तेर (प्रतिनिधी)-आर्ट ऑफ लिविंग परिवार तेर यांच्या वतीने श्रावण मासानिमित्त कोष्टाबिकादेवी  मंदिरात 21 ऑगष्टला सामुहिक रुद्र पूजेच्या आयोजन करण्यात आले होते.                                  

याप्रसंगी आर्ट ऑफ लिविंग बेंगलोर चे वेदांत स्वामीजी यांनी रुद्र पूजा केली. रुद्र पूजेमध्ये साधकांनी पृथ्वीच्या समृद्धतेसाठी संकल्प केला. यावेळी आर्ट ऑफ लिविंग परिवार र्तेरचे साधक विजयसिंह फंड, नवनाथ पांचाळ ,बालाजी भक्ते, बबन कोकरे, सोमनाथ यादव ,नेताजी फंड, अर्चना फंड, भाग्यश्री भक्ते, रेश्मा साळुंखे ,रमेश गायकवाड, ओमप्रकाश नाईकवाडी यांच्यासह  भाविकभक्त उपस्थित होते.

 
Top