धाराशिव (प्रतिनिधी)- शहारातील प्लाईंग किडस्‌‍ इंटरनॅशनल इंग्लीश स्कूल जाधववाडी रोड येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने जिल्हा संस्कार भारती समिती व प्लाईंग किडस्‌‍ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्णरूप सज्जा स्पर्धा संपन्न प्रथम मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्ण प्रतिमेचे पुजन व आरती करण्यात आली व शाळेतील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाच्या गीतावर समुहा नृत्य सादर केले व दहिहांडी फोडण्यात आली त्यानंतर स्पर्धेस सुरुवात झाली.

नर्सरी ते 5वी पर्यंतच्या एकूण 60 स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला संस्कार भारतीच्या पदाधिकाऱ्यांनी परिक्षणातून नर्सरी प्रथम अर्जुन आदित्य पाटील, द्वितीय रघुवीर सचिन पेठे , तृतीय समजीत जाधव , युकेजी प्रथम राजवीर राहूल लंगडे , द्वितीय मल्हार विवेक मुंडे , तृतीय ओम परमेश्वर राठोड इ. 1ली प्रथम द्वितीयअभिमन्यु व्हटकर, तृतीय कार्तिक सुरवसे, सिध्दी पेठे इ .2री अभय पवार, राजवीर धाबेकर, विनायक घोणे,इ. 3री अनुजा कांबळे, सिद्धी संकपाळ, गितीका  पवार इ. 4थी आर्यन गायकवाड, समीहा तांबोळी , धनश्री कांबळे इ.5वी संध्या पेठे , प्रणया पेंदे यांना देवगिरी प्रांत चित्रकला विधाप्रमुख शेषनाथ वाघ संस्कार भारती जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर भन्साळी, शहराध्यक्ष शरद वडगावकर जिल्हा संगीत प्रमुख सुरेश वाघमारे, प्राचार्य चंद्रमणी चर्तुवेदी सदस्य अनिल मालखरे यांचे बक्षीस प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. बासरी वादन केल्याबद्दल गणेश यादुराव माळी यास ही गोरविण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी जिल्हाकार्याध्यक्ष अनिल ढगे, जिल्हा सचिव प्रभाकर चोराखळीकर, धनंजय कुलकर्णी आदि मान्यवर सदस्य, प्रशालेचे कलाध्यापक जगदीश सुतार सह शिक्षकशिकेत्तर कर्मचारी वृंदांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनींनी केले .


 
Top