परंडा (प्रतिनिधी) - आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या नेत्रुत्वावर व विकास कामावर विश्वास ठेवून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गटात) तालुक्यातील आसु येथील अनेक युवकांचा जाहीर प्रवेश करण्यात आला.
राज्याच्या विधानसभेच्या निवडणुका काही महिन्यावर होणार असल्याने या अनुषंगाने परंडा - भूम - वाशी विधानसभा मतदारसंघात सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापत असताना परंडा तालुक्यात शिवसेना शिंदे गटात मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यावर विश्वास ठेवून अनेक युवक व कार्यकर्ते पक्ष प्रवेश करत असल्याने शिवसेना शिंदे गटाची ताकत परंडा तालूक्यात वाढताना दिसत आहे.
मंगळवार दि.27 ऑगस्ट रोजी आसु गावातील सचिन पवार, पंकज जाधव,रणजित इथापे,समाधान इथापे,नितीन वाघे, निखिल कोल्हे,अनिल पवार,चैतन्य पवार,राज काकडे, ऋषिकेश चव्हाण, कानिफ मासाळ, हरी लोखंडे, विनायक नेटके, शाम परदेशी, निखिल खुने, अनिकेत परदेशी,विनोद इथापे,संतोष पवार,युवराज पवार, माऊली गोफने, सारंग जाधव, सूरज वाघमोडे, तुषार गायकवाड आदींनी धनंजय सावंत यांच्या नेतृत्वात हा प्रवेश भैरवनाथ शुगर वर्क्स सोनारी येथे केला. प्रवेश केलेल्या युवकांचा शिवसेनेचा भगवा गमजा देऊन सन्मान करून स्वागत करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी पंचायत समिती सभापती गौतम लटके, माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता मोहिते, निलेश चव्हाण यांच्या उपस्थिती मध्ये युवकांचा जाहीर प्रवेश झाला.