धाराशिव (प्रतिनिधी)-रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाडोळी (आ.) येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये चार विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.19 वर्ष वयोगटात तीन विद्यार्थी तर सतरा वर्ष वयोगटात एक विद्यार्थी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र झाले.
कृष्णा तुकाराम गुंड, नरहरी गोविंद मुळे, वैदही दत्तात्रय पवार, नेहा बापू शेख, हे विद्यार्थी जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्र झाले. यांच्या यशाबद्दल जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा रुपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. व्यंकटराव विश्वनाथ गुंड, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सुधाकर गुंड गुरुजी, समुद्रवाणी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी आदटराव, केंद्रप्रमुख मोरे सर, तालुका क्रीडा संयोजक बिभीषण पाटील, बुद्धिबळ जिल्हा ऑर्बिटर महादेव भोरे, रुपामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, सुरेश मनसुळे, मुख्याध्यापक सूर्यवंशी, क्रीडाशिक्षक, बी. एम .शेख, शाळेतील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.