तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शहरासह परिसरात शुक्रवार दि. 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी सणा निमित्ताने श्रीतुळजाभवानी मंदीरात नागदेवतेची प्रतिष्ठापना करण्यात आली. या नागदेवतेच्या दर्शनार्थ सुवासनी महिला व भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नागपंचमी निमित्ताने सांयकाळी 05 ते 06 या कालावधी मंदीर पुरुषांसाठी बंद केले होते. या कालावधीत मंदीरात महिलांनी फेर धरुन अनेक खेळ करुन नागपंचमी सणाचा आनंद लुटला.