धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील घुगी येथील विविध विकासकामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी युवती काँग्रेस (शरदचंद्र पवार) च्या प्रदेशाध्यक्ष तथा मा. जिल्हा परिषद सदस्य  सक्षणाताई सलगर यांच्या हस्ते झाले.

घुगी गावातील मुख्य चौकामधील मस्तान शहावली दर्ग्याच्या समोरील चौकामध्ये  विविध सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम होतात. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे सक्षणाताई सलगर यांनी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या  (शरदचंद्र पवार)  राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या फंडातून 10 लाख रुपये निधी मंजूर करून घेतला. या निधीतून घुगी येथील मस्तान शहावली दर्ग्याच्या समोरील चौकामध्ये पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहे.  या कामाचे भूमिपूजन सक्षणाताई सलगर यांच्या हस्ते  करण्यात आले. त्यामुळे गावातील सर्वसामान्य लोक समाधान व्यक्त करत आहेत.  

याप्रसंगी घुगी गावच्या सरपंच सौ. शुभांगी गोविंद पवार, बळीराम सगर, नवनाथ बनकर, सतीश जावळे, दत्ता जावळे, माणिक जावळे, अर्जुन जावळे, गोविंद पवार, शरद जावळे, राकेश जटाळे, इलाही  शेख, मस्तान शेख, चाँद फकीर, बाबु पटेल, गुलाब शेख, गौसपाक फकीर तसेच गावातील इतर प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.


 
Top