धाराशिव (प्रतिनिधी)- समाजातील काही विकृत मानसिकतेमुळे मुली आणि महिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये हिम्मत न हारता आत्मविश्वासाने सामोरे जाणे अत्यावश्यक आहे. या गोष्टीचा विचार करून आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा धाराशिव नगरपालिकेचे माजी गटनेते युवराज नळे यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून दि. 1 सप्टेंबर पासून सायंकाळी पाच ते सहा या वेळेत सर्व प्रकारच्या वयोगटातील मुली आणि महिलांसाठी त्यांच्यात शारीरिक आणि मानसिक कणखरता निर्माण करण्यासाठी दोन महिने मोफत कराटे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.
युवराज नळे हे कराटे क्षेत्रातील जुने अनुभवी मुख्य प्रशिक्षक (ब्लॅक बेल्ट 3 डिग्री) असून इंडियन तायक्वांदो ॲन्ड किक बॉक्सिंग असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी यापूर्वी अनेक वर्षे कराटे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहे. यामध्ये इतरही काही असोसिएशन सहकार्य करणार आहेत. सद्यस्थितीत महिला व मुलींच्या मनात आत्मविश्वास निर्माण व्हावा व त्यांना स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत या उद्देशाने कराटे क्षेत्रातील सहकारी भास्कर ढगे, प्रविण गडदे, हरिदास रोकडे, रफिक शेख, सुनील शिंदे, रणजित कोकणे, तानाजी माने, हरिश सुर्यवंशी , वैष्णवी सरडे, अपूर्वा कुलकर्णी अशा काही ब्लॅक बेल्ट सहका-यांसह प्रशिक्षण देण्याचा हा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षण शिबिरात फिजिकल फिटनेस सह कराटे मधील स्वसंरक्षणाचे तंत्र, ज्युडो व लाठीकाठीचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. भाजपच्या वतीने आयोजित सदरच्या प्रशिक्षणासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून दोन महिने प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी ज्या महिला व मुलींना आत्मसंरक्षण व आत्मसन्मानासाठी कराटे प्रशिक्षण घ्यायचे आहे त्यांनी हरिदास रोकडे 7841034628 , योगिनी फुगारे 9405660603 , ऋतुजा खरे 9307786765 व वैष्णवी सरडे 9403707591 या क्रमांकावर संपर्क साधून 30 ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करावी असे आवाहन युवराज नळे यांनी केले आहे.