धाराशिव (प्रतिनिधी)- येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात 9 ऑगस्ट हा क्रांती दिन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ .सावता फुलसागर यांनी उपस्थित सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले की , 9 ऑगस्ट 1942 रोजी चले जाओ गांधीजींच्या पुढाकाराने सुरू करण्यात आली होती. स्वातंत्र्यसंग्रामातील चले जाओ चळवळ ही निर्णय स्वरूपाची लढाई होती . या चळवळीने देशव्यापी स्वरूप प्राप्त केले आणि त्याचे पडसाद संपूर्ण देशामध्ये उमटले. ते पुढे म्हणाले की,स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिवीरांना बलिदान द्यावे लागले. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 9 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून आपण देशभर साजरा करतो. याप्रसंगी प्राध्यापक माधव उगिले यांनी सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले. त्यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.