धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्री कपालेश्वर मंदिरा कडे जाणाऱ्या पूलावर संरक्षण भिंत बांधणी कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. 

श्री कपालेश्वर मंदिर मार्गालगत असलेल्या भोगावती नदी प्रवाहाचा भाग सखल  आहे. मंदिराकडे जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी व परिसरातील नागरिकांसाठी अतिशय धोकादायक झालेल्या या मार्गावर  संरक्षण भिंत बांधणे आवश्यक असल्याची मागणी परिसरातील रहिवासी व भाविक भक्तांनी केल्यानंतर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून सदरील कामास निधी मंजूर करून घेण्यात आला होता. या कामाचे भूमिपूजन श्री. नितीन काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना नितीन काळे म्हणाले की शहरवासीयांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी भाजपा कटिबद्ध आहे तसेच धाराशिवरांच्या अपेक्षा या आगामी काळात पूर्ण करण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी कामात राहतील असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी परिसरातील नागरिकांनी श्री. नितीन काळे यांचा सत्कार करून या गतिमान कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी कपालेश्वर मंदिराचे पुजारी श्री. बालाजी क्षीरसागर, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अभय इंगळे, अभिजीत काकडे, दाजी आप्पा पवार, गणेश आसलेकर, रामभाऊ काकडे ,सुनील पंगुडवाले,सचिन लोंढे, संभाजी इंगळे, अनिल आसलेकर, बाळासाहेब काकडे, प्रसाद मुंडे, सौरभ काकडे, ओंकार देवकते, वैभव पाटील, अरविंद देवकते,  रत्नदीप मेटकरी, नवनाथ सोलंकर, सागर दंडनाईक यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top