धाराशिव (प्रतिनिधी)-बहुजनांचा चेहरा व सुशिक्षित महिला नेतृत्व म्हणून जनसामान्यांमध्ये त्यांची प्रतिमा आणि जनसामान्यांचा आवाज बनलेल्या बहुजन ओबीसी चळवळीच्या सक्रीय महिला नेत्या अशी त्यांची ओळख आहे.तुळजापूर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेची व अठरा पगड जनतेची इच्छा आहे. की डॉ. स्नेहाताई यांनी  निवडणुक लढवावी व प्रस्थापितांना धक्का द्यावा आज पर्यंत प्रस्थापित घराण्याकडे या तालुक्याची सत्ता राहीली आहे.

इतरांना  संधी मिळाली नाही.त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष आहे त्यासाठी आता जनतेतून ही मागणी होत आहे की स्नेहाताई यांनी निवडणुक लढवावी व सर्व सामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून विधान सभेत जावे.सर्व सामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी गाव पातळी पासून राज्य पातळी पर्यंत त्या काम करीत आहेत डॉ. स्नेहाताई आप्पाराव सोनकाटे या मूळच्या सिंदगाव ता. तुळजापूर येथील रहिवाशी आहेत. त्यांनी आता येणाऱ्या विधान सभेसाठी तुळजापूर मधून निवडणुक लढवावी अशी तुळजापूर ग्रामीण जनतेची मागणी पुढे येत आहे . विद्यार्थीदशे पासून त्या सामाजिक चळवळीत कार्यरत आहेत. आता सर्व सामान्य लोकांचा हक्काचा आमदार पाहिजे अशी जनतेत चर्चा आहे.डॉ स्नेहा ताई यांचा विजय निश्चित होईल असे तालुक्यातील जनतेमध्ये सांगण्यात येत आहे.


 
Top