धाराशिव (प्रतिनिधी)-विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षापासून उमरगा-लोहारा विधानसभा लढवण्याची तयारी करत असलेले सातलिंग स्वामीं यांनी मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शरद पवार, संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, महादेव माने, ओमकार गायकवाड, विजय स्वामी, ज्ञानेश्वर कांबळे, दिनेश पाटील, समाधान सरडे, आतिश गाटे ,महादेव मगर, औदुंबर क्षीरसागर, हरिदास पवार, मंजूताई शिरसागर, दिपालीताई मगर आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह तब्बल 40 ते 50 छाव्यासह भेट घेवून आगामी उमरगा-लोहारा  विधानसभा निवडणूकीसंदर्भात सांगोपांग चर्चा केली. दोन गोपनीय फाईल जरांगे पाटील यांना सुपूर्द केली. याप्रसंगी मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे सातलिंग स्वामी यांनी सांगितले.


 
Top