भूम (प्रतिनिधी)-  बीड-येरमाळा- बार्शी मार्गे जाणाऱ्या पंढरपूर कोल्हापूर गाड्या बसेस सरमकुंडी-भूम -वारदवाडी परांडा मार्गे चालू करण्यात यावी, अशी मागणी भूम तालुका पत्रकार संघाच्या वतीने पालकमंत्री तानाजीराव सावंत यांच्याकडे केली आहे.

सरमकुंडी फाटा ते भूम मार्गे पंढरपूर कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाड्या नसल्याने भूम व परंडा तालुक्यातील लोकांना विनाकारण बार्शी बस स्थानकात जाऊन बसावे लागत आहे. संभाजी नगर बीड आधी ठिकाणच्या गाड्या वाशी शहरात न न जाता सरमकुंडी मार्गे येरमाळा बार्शी या मार्गावर धावत आहे. या गाड्या जर सरमकुंडी फाटा मार्गे भूम आणि परांडा स्थानकातून कुर्डूवाडी कडे रवाना झाल्या. तर निश्चितपणाने भूम, परांडा तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पंढरपूर व कोल्हापूर हे दोन्ही मोठे देवस्थान असल्याने बरेच भक्तगण या तालुक्यातून देवस्थानाला जात आहेत. तसेच जैन धर्मियांचे तीर्थस्थान असणाऱ्या पैकी एक तीर्थस्थान कुंथलगिरी येथे असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील भाविक भक्त यांना येण्यासाठी मोठी पराकाष्टा करावी लागत आहे. 

सदर प्रकरणीपालकमंत्री महोदय यांनी तात्काळ दखल घेऊन संभाजीनगर-कोल्हापूर, सांगली औरंगाबाद, बीड कोल्हापूर, माजलगाव-कोल्हापूर, संभाजीनगर-इचलकरंजी, संभाजीनगर-सांगली, संभाजीनगर-पंढरपूर,इस्लामपूर, बीड-इस्लामपूर इत्यादी गाड्या वाशी शहरात प्रवास न करता थेट येरमाळा बार्शी मार्गे प्रवास करत असल्याने संभाजीनगर बीड वरून प्रवास करणाऱ्या वाहकांना विनाकारण लांब पल्ला चा प्रवास करावा लागत आहे. अशी मागणी भूम तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार गौस शेख, धनंजय शेटे, अरविंद शिंदे, अजित बागडे, अरुण देशमुख, आशिष बाबर, प्रल्हाद आढागळे, तानाजी सुपेकर, सुनील कुमार डुंगरवाल, उदय साबळे यांच्या वतीने करण्यात आली आहे.


 
Top