धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे वैचारिक स्तंभ ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. हरी नरके यांच्या पुण्यतिथी निमित्त धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे समता परिषदेच्या वतीने प्रा.हरी नरके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत विनम्र आदरांजली अर्पण केली.
यावेळी समता परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष आबासाहेब खोत, जिल्हाध्यक्ष बिभिषण खुने, धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, डॉ एन एम काझी,व्यंकट जाधव,रॉबीन बगाडे,भारत जाधव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपोषणास्त्र उपसताच समता नगर परिसरातील सिमेंट रस्ते, नाली व खड्डे बुजविण्याच्या कामाला गती
धाराशिव (प्रतिनिधी) - समता नगर येथील कॉक्रीट नाली व कॉक्रीट रस्त्याचे काम संथगतीने चालु असून ही कामे तात्काळ पुर्ण करावीत. अन्यथा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा समता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाटगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता व मुख्याधिकारी यांना दि.10 ऑगस्टपासून उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. याची दखल घेऊन लागलीच समता नगर परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येत आहे. तर सिमेंट रस्ते व नाली कामांचे कार्यारंभ आदेश दिले आहेत. त्यामुळे गेंड्याची कातडी पांघरूण झोपेचे सोंग घेणाऱ्या यंत्रणेला ताळ्यावर आणण्याचे काम समता सहकारी गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब घाटगे यांनी केले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग व नगर परिषद यांनी धाराशिव शहरातील समता नगर परिसरातील बेलुकर यांचे घर जगदाळे घर यादलापुरे घर ते मैदंगी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याची लांबी 79.30 मीटर व रुंदी 4 मीटर या रस्त्याचे काम तर व्ही पवार घर सुलाखे घर सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली करणे. या नालीची लांबी 10 मीटर व रस्त्याची लांबी 77.30 मीटर व रुंदी 4 मीटर आहे. तसेच काटे घर ते दत्त मंदिरापर्यंत 94.50 मीटर नाली करणे. तर सुरवसे घर ते शेरखाने घर कॉक्रीट 64 मीटर व रुंदी 5 मीटर रस्ता करणे ही कामे समता सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. धाराशिवच्या परिसरात मंजुर असून संदर्भ क्रमांक - 2 अन्वये आपण पत्रात नमुद केलेले रस्ते क्रमांक - 1 व 2 हे नगर परिषद अंतर्गतची कामे आहेत. त्यामुळे या कार्यालयाच्या अधिपत्याखाली असलेली वरील कामे संबंधित कंत्राटदार यांनी दि.7 ऑगस्ट 2024 पासून चालु केलेली असून ही कामे संबंधित कंत्राटदाराकडून गुणवत्ता पूर्वक व वेळेत पुर्ण करुन घेण्यात येईल. तर खडी करणाचे काम 8 ते 10 दिवसात पुर्ण करून देण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आपण उपोषणाचा मार्ग अवलंबवू नये अशी विनंती प्र.दि.मोरे उपविभागीय अभियंता व वसुधा फड मुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव यांनी लेखी निवेदनातुन केल्यामुळे घाटगे यांनी ते उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे.