धाराशिव (प्रतिनिधी)- सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी संध्याकाळी 6 वा. स्वयंवर मंगल कार्यालय जिजाऊ चौक धाराशिव येथे शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने संभाषण कौशल्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री गौरव बागल अध्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळा समिती हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनीलराव मिसाळ हे लाभले होते. या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील आघाडीचे वक्ते शिवव्याख्याता श्री साईनाथ रुद्रके सर यांची उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक व वक्ते श्री साईनाथ रुद्रके यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मांडणीतून तसेच प्रभावी वक्तृत्वाच्या बळावर संभाषण कौशल्य मधील वेगवेगळ्या पैलूवर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन कसे करावे? आभार प्रदर्शन कसे करावे? प्रभावी व्याख्यान कसे द्यावे? संवाद संभाषण कौशल्य कसे आत्मसात करावे? वीर रस शांत रस हास्य रस करून रस यासह विविध रसांचे रसाळ भाषेमध्ये वर्णन करण्यात आले होते. व्याख्यान करताना हाताचे हावभाव तसेच चेहऱ्यावरील हावभाव यांचे सूक्ष्म पणे काम दाखवून दिले. सूत्रसंचालन करताना तसेच आभार प्रदर्शन करताना घ्यावयाची काळजी याबाबतीत देखील त्यांनी अतिशय समर्पक असे मार्गदर्शन केले. या विविध विषयावर सुमारे दोन तास अतिशय प्रबोधन पर असे मार्गदर्शन केले.शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी या संभाषण कौशल्य कार्यशाळेचा खूप मोठा फायदा झालेला आहे. समितीच्या सदस्यांनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमास समितीचे श्री. सुनील मिसाळ श्री आकाश भोसले श्री अजय तनपुरे श्री योगेश आतकरे श्री संजय मुळे श्री प्रतापसिंह काकडे श्री विश्वंभर आगळे यांचे सह समितीचे  बहुसंख्य आजी माजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top