धाराशिव (प्रतिनिधी)-जिल्हास्तरीय शालेय लॉन टेनिस स्पर्धा तुळजाभवानी स्टेडियम येथील लॉन टेनिस कोर्ट वर पार पडल्या. स्पर्धेचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे व दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले. दोघांनीही श्रीफळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन करून सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर, माजी उपनगराध्यक्ष अभय इंगळे, क्रीडाधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, शहराध्यक्ष सुजित साळुंके, राजाभाऊ कारंडे, अमोल राजेनिंबाळकर, अजिंक्य राजेनिंबाळकर, गणेश मोरे, क्रीडा कोच डिंपल ठाकरे, अक्षय बिराजदार, अजिंक्य वराळे, इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनचे अध्यक्ष युवराज नळे यांनी केले तर आभार सचिव हर्षद जैन यांनी मानले. यश हुंडेकरी, सुयश आडे, प्रियंका हंगरगेकर या प्रथम क्रमांक विजेत्यांसह, कृष्णा थिटे, समर्थ शिंदे, श्रेयस गायकवाड, प्रथमेश अमृतराव, विश्वदीप गंगणे, शंभूराजे गंगणे, शुभांगी नन्नवरे, गार्गी पलंगे, शाकंभरी बर्वे, विलक्षणा चव्हाण या खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे व असोसिएशनचे अध्यक्ष युवराज नळे यांनी शुभेच्छा दिल्या.