धाराशिव (प्रतिनिधी)- फिर्यादी हनुमंत मच्छिद्र काळे, वय 26 वर्षे, रा.चिखली ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 90,000 किंमतीची एक गावरान जातीची म्हैस ही दि. 07.08.2024 रोजी सांयकाळी 7.00 ते दि. 08.08.2024 रोजी 06.00 वा. सु. हनुमंत काळे यांच्या चिखली शिवारातील शेतातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- हनुमंत काळे यांनी दि.08.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे गुरंन 181/2024 कलम भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे चिखली, ता. जि. धाराशिव येथील- शिवराम यशवंत काळे यास गुन्हा घडल्यापासून अवघ्या काही तासांत वरुडाकडे जाणारे रोडच्या जवळून ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातून नमूद चोरीची म्हैस एकुण 90 हजार रूपये किंमतीची म्हैस ताब्यात घेवून नमुद आरोपीस पुढील कार्यवाहिस्तव चोरीच्या म्हैससह बेंबळी पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कामगीरी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके, पोलीस हावलदार हुसेन सय्यद, प्रदीप वाघमारे, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर,रवींद्र आरसेवाड, चालक प्रशांत किवंडे, प्रकाश बोईनवाड, यांच्या पथकाने केली आहे.