भूम (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तत्कालीन प्रशासकीय सभापती प्रशांत पंडितराव चेडे, नरसिंह उंदरे व तत्कालीन सचिव चंद्रकांत निपाणीकर यांच्याविराेधात २४ लाख ७० हजार रुपयांच्या अपहारप्रकरणात वाशी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंकेक्षक (आडिटर) केशव बाेंदर यांच्या तक्रारीवरून वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वाशी ठाण्याचे पाेलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांनी दिली.
राज्याचे पणनमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे मुरलीधर सदाशिव तागडे यांनी एक तक्रार दाखल केली हाेती. त्यात पणन संचालक, धाराशिव जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था), वाशी कृषी उत्पन्न बाजार समिती, प्रशांत पंडितराव चेडे, हस्तक्षेप अर्जदार जुबेर दाैड काझी (वाशी), संजय उद्धव कवडे व विकास शिवाजी पवार हे प्रतिवादी हाेते. प्रशांत चेडे बाजार समितीवर सभापती हाेते. वाशी बाजार समितीला महाराष्ट्र कृषी पणन मंडळाकडून ५२ लाख १३ हजार ६४७ एवढे कर्ज मंजूर करण्यात आले हाेते. तागडे यांच्या तक्रारीवरून बाजार समितीने केलेल्या खर्चाबाबत २०१३ या कालावधीत फेरलेखापरीक्षण आदेशित करण्यात आल हाेते. या अहवालात ८२ लाख ५० हजार २०६ इतक्या रकमेच्या जमाखर्चाची सखाेल पडताळणी करून २०१३ ते २०१६ या कालावधीत लेखापरीक्षण अहवालात नमूद असलेल्या पूर्वीच्या २४ लाख ७० हजार रकमच्या अपहाराबाबत सखाेल विवेचन करणे आवश्यक हाेते.