कळंब (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हांतर्गत कळंब तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जि.प.प्रा.शाळा ढोराळा शाळेतील मुले व मुली यांच्या दोन्ही संघाने क्रीडा संकुल कळंब येथे झालेल्या खो खो स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. या खो – खो स्पर्धेत १४ वर्षा खालील मुले व मुली संघाने प्रथम क्रमांक पटकाविला.या १४ वर्षाखालील मुले व मुली संघाची जिल्हास्तरीय खो – खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सलग तीन वर्षे तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत अव्वल येण्याचा बहुमान ढोराळा शाळेच्या नावावर नोंद झाला आहे. वरील सर्व खेळाडूंचे तसेच उत्कृष्ठ कामगिरी बद्दल वैभव चौधरी व कन्हैया नाईकनवरे या दोन खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. क्रीडा शिक्षक जालिंदर बेलगुरे यांचे मार्गदर्शन लाभले.या सर्व यशस्वी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शाळेच्या व ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी शिराढोण बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी श्री. संतोष माळी,गावातील ज्येष्ठ नागरिक काशिनाथ भोसले पांडुरंग चौधरी सुनील नाईकनवरे , नितीन भोसले , बालाजी नाईकनवरे , शहाजी नाईकनवरे, धनंजय नाईकनवरे , पांडुरंग नाईकनवरे , महादेव लाकाळ ,अशोक थोरात , राम सोनटक्के, लहु चौधरी, मुख्याध्यापक लक्ष्मण जमाले शिक्षक विजय जायभाय, आप्पासाहेब गोरे , रमेश कदम ,उषाताई मुंढे, सुरेखा पालकर सुलोचना घंटे, स्वाती कऱ्हाळे यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन करून यावेळी पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी असेच यशस्वी व्हा अशा शुभेच्छा देण्यात आल्या .