भूम (प्रतिनिधी)- आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्या बैठकीमध्ये मित्र पक्षाच्या आमदाराकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रत्येकाने हा मतदार संघ भाजपला सोडवून घ्यावा असा एकमेव सूर लावला . या सुराला अनुसरून नक्कीच तशा पद्धतीचा अहवाल पक्षश्रेष्ठीकडे पाठवून प्रयत्न करणार असल्याचे अभिवचन पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड अनिल काळे यांनी दिले .
बुधवार दिनांक 28 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात पक्षाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विधीज्ञ अनिल काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जम्बो बैठक झाली . यावेळी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती गण व गटनिहाय रचनेचा आढावा घेतला . याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रत्येक गण - गटामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने महिलांचे जम्बो मेळावे घेण्यात यावे असे आवाहन केले .
या बैठकी दरम्यान प्रत्येक कार्यकर्त्यांनी सत्ताधारी मित्र पक्षाचे आमदारांनी कसल्याही प्रकारचे सहकार्य गेल्या पाच वर्षात केले नाही, यापुढेही करतील की नाही भरोसा नाही, यासाठी परंडा मतदार संघ भाजपला सोडवून घ्यावा असा एकमुखी सूर कार्यकर्त्यांनी लावला. दरम्यान विधिज्ञ अनिल काळे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही गट स्तरावर महिला मेळावे घ्यावेत, वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्य योजना, शेतकरी वीज, कर्ज माफी योजना, महिलांना एस टी प्रवास मोफत योजना, मुलींना मोफत शिक्षण योजना, शेतकरी सन्मान योजना अश्या अनेक लोककल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहच करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन करून येणाऱ्या विधान सभेच्या निवडणूकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मतनी विजय करावे असे आव्हान ऍड श्री अनिल काळे साहेब यांनी केले .
यावेळी ता. सरचिटणीस संतोष सुपेकर, भाजपा नेते जालिंदर तात्या मोहिते, जिल्हा चिटणीस अंगद मुरूमकर, भाजपा नेते काकासाहेब चव्हाण, ता.प्रसिद्ध प्रमुख शंकर खामकर, विकास जालन, सौ. लताताई गोरे, अ.जा.ज ता. प्रदीप साठे, ता. युवा अध्यक्ष गणेश भोगील, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर , ता. चिटणीस संतोष औताडे, चंद्रकांत गवळी, ज्ञानेश्वर गिलबिले , अतुल अंधारे, बाबासाहेब गीते, मुकुंद वाघमारे , रोहिदास भोसले, सुहास सानप , संदीप महानवर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.