धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील श्री बाल हनुमान गणेश मंडळ स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले मंडळ आहे. साठाव्या वर्षी लेझीम सरावाचा शुभारंभ वाद्यपूजन करून करण्यात आले.
शुभारंभ मंडळाचे कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन उपाध्यक्ष मनमत पाळणे, व्हॉलीबॉलचे राष्ट्रीय खेळाडू प्रा. गजानन गवळी, मंडळाचे मूर्तिकार, गुणवंत कामगार पुरस्कतेॅ काशिनाथ दिवटे, विद्या साखरे, संजय पाळणे, विश्वास दळवी यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून, पेढे व प्रसाद वाटप करून संपन्न झाली. नवशिके व सतत खेळणारे यांची असणारी एक ताल एक सूर व खेळातील विविध प्रकार हे वाद्याच्या इशाऱ्यावर पूर्णपणे खेळ करीत असतात.
मंडळातील लहान, थोर कुणाल दिवटे, मनोज अंजीखाने, युवराज हुच्चे, एडवोकेट निलेश बारखेडे, मुझे मिल पठाण. दत्ता वाडकर, केदार उपाध्ये, दहीहंडे बंधू, देशमाने बंधू व महिलांचा मोठा सहभाग या गणेशोत्सवामध्ये आजही तागायत जिवंतपणा ठेवला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भालचंद्र हुच्चे व आभार राजकुमार दिवटे यांनी मानले. दैनंदिन सराव रोज दोन तास करणे ठरले आहे. मंडळाच्या वतीने श्रीच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. सर्वांना निरोगी जीवनप्राप्त व्हावे. शोभेची दारू व फटाक्याच्या आतषबाजीत आवाजात लेझीम खेळायला सुरुवात करण्यात आली.