तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर लातूर रस्त्यावर असणाऱ्या खंडाळा पाटी जवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवार दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजता घडला.

या बाबतीत अधिक  माहीती अशी की, लातूरहून भरधाव येणाऱ्या कारने धाराशिव तालुक्यातील बामणी येथील गुजर दांपत्यास रस्ता ओलांडत असताना दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान जोराची धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. बामणी येथील कालिदास महादेव गुजर वय 60 वर्ष व त्यांच्या पत्नी राजाबाई कालिदास गुजर हे दोघे पती-पत्नी बामणी येथून तुळजापुरला काही कामानिमित्त जात होते. दरम्यान खंडाळा पाटीजवळ आले असता ते तुळजापूरच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना लातूरहून तुळजापूरकडे जाणाऱ्या एम. एच. 14 के. जे. 3020 या कारने जोराची धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की स्कूटर सहित गुजर पती-पत्नीस 500 फूट ओढत नेले.  त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना असा परिवार आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
Top