तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी मंदीरात दिप अमावस्या निमित्ताने मंदिरातील दिवे स्वच्छ करुन त्याचे पुजन महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा यांच्या हस्ते सांयकाळी विधीवत पुजन मंदिरात करुन करण्यात आले.

सर्वप्रथम छञपती शिवाजी महाराज यांनी देविजींच्या मुख्य गर्भगृहात लावण्यासाठी दिलेला दिवा, सिंह गाभाऱ्यातील नंतर एक आरती, दिव्यांचे झाड हे दिवे घासुन करुन धुवुन घेवुन स्वछ करण्यात आले. नंतर सांयकाळी मंदिरात या दिव्याचे मनोभावे पुजन देविचे महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा यांनी केले.

यापुर्वी दिप अमावस्येला मंदिरातील दगडी  दिपमाळा स्वच्छ करीत असत. पण त्या आता नसल्याने फक्त उपलब्ध दिव्यांचे पुजन केले जाते. दीप अमावस्येला दिपपुजन अनादी कालापासून केले जाते.

 
Top