कळंब (प्रतिनिधी)- कळंब उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने संघटनेचे कळंब तालुका अध्यक्ष विठ्ठल यादव यांनी दि.20ऑगस्ट पासून आमरण उपोषण सुरू केले असुन त्यांनी या पुर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले होते. त्यामध्ये नागझरवाडी येथील समस्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या मागण्या केल्या होत्या. परंतु सदरील मागण्यांवर काहीच कार्यवाही झाली नसल्यामुळे ते उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात आमरण उपोषणाला बसले आहेत. दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग 241 खेर्डा पाटी ते नागझरवाडी ते पुढे कळंब तालुका हद्दीपर्यत रोडचे निकृष्ट काम करणाऱ्या गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावी, व सदर रस्त्याची पाहणी करून रस्त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे करून देण्यात यावे, कळंब ते येडशी रस्त्याचे मार्च (2024-25) चे पॅचवर्क दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे करणाऱ्या अधिकाऱ्यावर व गुत्तेदारावर कारवाई करण्यात यावी, नागझरवाडी गावातील सरकारी मालमत्तेची नासधूस व शौचालय पाडून त्या जागी अतिक्रमण करणाऱ्या सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर पंचनामा करून कार्यवाही करण्यात यावी, नागझरवाडी गावातील सरकारी दवाखाना चालू करण्यात यावा, व दवाखान्याकडे जाणारा रस्ता दुरुस्त करावा, तसेच दवाखान्याला पाणी लाईट यांची व्यवस्था करण्यात यावी, नागझरवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेची संरक्षण भिंतीचे काम करून देण्यात यावे, नागझरवाडी गावातील अवैध दारू व गुटखा बंद करण्यात यावा, गोविंदपुरत ते खामसवाडी मोहा ते रामगड पाटी पर्यंतचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या गुत्तेदारावर व गुत्तेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कठोर कार्यावर करण्यात यावी.या मागण्या करीता छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष विठ्ठल यादव हे उपोषणाला बसले आहेत तरी मागण्या मान्य झाल्याशिवाय आमरण उपोषण सोडणार नाही असे त्यांनी वेळी त्यांनी सांगितले.

 
Top