भूम (प्रतिनिधी)- पंचायत समिती सभागृह भुम येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकास्तरीय महामंडळ आयोजित करण्यात आले होते.महामंडळ सभेसाठी तालुक्यातुन बहुसंख्येने शिक्षक उपस्थित होते.या महामंडळात अनेक निर्णय घेण्यात आले.याच महामंडळ सभेत जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे यांनी तालुकाध्यक्ष पदासाठी उपस्थित शिक्षकांमधुन संजीवन तांबे यांची निवड केली.
कार्यक्रमास राष्ट्रीय शिक्षक संघाचे उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे अध्यक्षस्थानी होते. सभागृहातील उपस्थित शिक्षकातुन शिक्षक नेतेपदी रामेश्वर शिंदे,सरचिटणीसपदी दत्ता गुंजाळ,कार्याध्यक्ष दिपक वाळके,कोषाध्यक्ष दत्ता घुले,प्रसिद्धी प्रमुख प्रमोद ठाकरे,संपर्क प्रमुख शिवाजी भराटे,तालुका प्रवक्तेपदी संदिप शिंदे,उपाध्यक्ष पदी दादासाहेब साबळे,तात्या ढोरे महादेव भोरे,महंमद बागवान,संदिप मोरे,हरी झणझणे,अरुण कांबळे,बाबासाहेब मम्हाणे,रत्नदिप अंधारे संघटकपपदी रवी भोंग,लहु गायकवाड,केशव पिंगळे,महादेव तांबे,रणजित सोन्ने,चिटणीसपदी सुनील हजारे,लक्ष्मण उमाप,सोमनाथ तौर,अशोक नलवडे,अशोक जाधवर सरचिटणीसपदी विष्णु तांबडे,मनोहर गजरे,नितीन गिरी,गणेश घुले,दत्तात्रय गव्हाणे सुहास जोशी,संतोष मेंढेंकर, यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमासाठी सोमनाथ टकले भक्तराज दिवाणे,एल बी पडवळ, अर्जुन गुंजाळ,श्रीनिवास गलांडे,सुधीर वाघमारे,उमेश भोसले,प्रदिप म्हेत्रे, बालाजी पडवळ, राजेंद्र गव्हाणे,अमर गोरे,रवी कापसे, रणजित पाटील ज्ञानेश्वर देवराम यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शिक्षक प्रतिनिधी हजर होते.