भूम (प्रतिनिधी)-श्री गुरुदेव दत्त हायस्कूल भूम मध्ये महाराष्ट्र राज्य शासकीय बाल चित्रकला स्पर्धा 2024 आयोजित केली गेली होती. यामध्ये गट पहिला इयत्ता पहिली ते दुसरी, गट दूसरा तिसरी ते पाचवी, गट तिसरा सहावी ते आठवी, गट चौथा नववी ते दहावी असे चार गट करण्यात आले होते. प्रत्येक गटाला चित्र काढण्यासाठी वेग वेगळे विषय देण्यात आले होते व प्रत्येक गटाला दोन तास वेळ देण्यात आला होता. यामध्ये भुम केंद्रातील 10 शाळांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये दहा शाळांमधून एकूण 650 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. शासकीय चित्रकला स्पर्धा चे प्रमुख गटशिक्षणाधिकारी कार्यालय भूमचे विषय तज्ञ  आमगे सर होते. त्यांना सहाय्य करणारे चित्रकला शिक्षक राजाराम कोळी सर, राजू साठे सर व इतर शाळातील सर्व शिक्षकांनी चित्रकला स्पर्धेसाठी सहाय्यक केले.

 
Top