तुळजापूर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सर्वाच पक्षांना आपल्याकडे हवाहवासा वाटणारा तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रथमच पहिल्यांदा कमळ फुलविले. लोकसभा निवडणुकीत मात्र या मतदारसंघातून महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले.
त्यामुळे येथील भाजपचे नेते चांगलेच सतर्क झाले आहेत. मतदारसंघातील राजकीय समीकरणे पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे.
यंदा तुळजापूर विधानसभा मतदार संघाचा विचार केला तर दोन दादा, एक आण्णा, एक भैय्या, दोन भाऊ, एक ताई असे दिग्गज उमेदवार उभे राहण्यासाठी इच्छुक आहेत. या यादीत विधमान आमदार राणाजगजितसिंह पाटील, रोहन देशमुख , माजी आमदार मधुकर चव्हाण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अँड धिरज पाटील, अशोक जगदाळे, माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, सक्षणाताई सलगर या दिग्गजांन सह अनेक डझन भर उमेदवार इछुक आहेत. सदरील या दिग्गज इच्छुकांनी मतदार संपर्क अभियान सुरु केले आहे.
या दिग्गज नेत्यांमध्ये उमेदवारी साठी काय पण करायाची तयारी आहे. यातील काहीनी विविध पक्षाच्या वरिष्ट नेत्यांकडे उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार फिल्डींग लावली आहे. तशा चर्चा मतदार संघात होत आहे. शिवसेना उबाटा तर काही जण काँग्रेस कडुन इच्छुक असल्याची चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत ज्यांनी महाविकास आघाडीशी निष्ठा जपत काम केले. तुळजापूर तालुक्यातुन महाविकास आघाडीला 52 हजारची लीड मिळाल्याने महाविकास आघाडी तील सर्वच घटक पक्ष ही जागा आपल्या कडे घेण्यासाठी सरसावले आहे.
विधानसभेसाठी महायुतीकडून विधमान आमदार राणाजगजितसिंह पाटील, रोहन देशमुख तर महाविकास आघाडीकडून माजी आमदार मधुकर चव्हाण, काँग्रेस जिल्हाअध्यक्ष धिरज पाटील हे मुख्य दावेदार आहेत. माजी नगराध्यक्ष देवानंद रोचकरी, अशोक जगदाळे हे ही निवडणुक लढविण्यास इच्छुक आहे. तर राष्ट्रवादीक ाँग्रेस शरदपवारगटकडुन सक्षणा सलगर यांच्या नावाची चर्चा आहे. अजित पवार यांच्याकडून महेंद्र धुरगुडे हे ही उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. तुळजापूरचे युवा नेते विनोद गंगणे यांनी ही भाजपकडे उमेदवारी मागितली आहे.