धाराशिव (प्रतिनिधी)- प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन धाराशिव च्यावतीने प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्र शासनचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे करण्यात आले. यावेळी प्रहार दीव्यांग क्रांती आंदोलन धाराशिवच्या एकूण 111 व्या शाखेचे उद्घाटन करताना ,प्रहार दीव्यांग क्रांती क्रांती आंदोलनच्या कामाची प्रेरणा बाकीच्या कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे. मागील कित्येक वर्षापासून प्रहारचे धाराशिव जिल्ह्यात अतिशय उत्तमरित्या चालू आहे. याचा मला नक्कीच अभिमान आहे असे यावेळी बच्चु कडू यांनी सांगितले. 

यावेळी प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,सरपंच क्षीरसागर, तलाठी मुळेकर मॅडम, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे,जिल्हा उपाध्यक्ष महेश माळी,सचिव महादेव चोपदार,सूर्यकांत इंगळे, बाळासाहेब पाटील, महादेव खंडळकर, जमीर शेख, मान्यवर उपस्थित होते. या शाखेच्या स्थापनेसाठी जिल्हाउपध्यक्ष महेश माळी यांच्यासह इटकळ चे प्रहार शाखाध्यक्ष दादा जाधव, राणी मुसळे, मारुती पाटील, अनिल महाबोले, इरया स्वामी, सचिन लकडे  आदींनी परिश्रम घेतले

 
Top