परंडा (प्रतिनिधी) - महाराष्ट्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांचे  दोन महिण्याचे  आर्थिक सहाय्य  3000 रुपये महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परंडा येथे  जमा झाल्याने लाभार्थ्यांची खूप मोठी गर्दी झाली होती. 

बँकेतील कर्मचाऱ्यांना या लाभार्थ्यांना बँकेत काम करताना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी अशीश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेतील सर्व कर्मचारी पूर्ण दिवस या लाभार्थ्यांचे मानधन वाटण्यात काटे वरची कसरत करत होते. राखी पौर्णिमेच्या मुहूर्तावर या योजनेची मानधन नुकतेच बँकेत जमा झाल्याने तर काहीचे जमा न झाल्याने चौकशीसाठी तुफान गर्दी करण्यात आली होती. सहाय्यक शाखाधिकारी अभिजीत शिंदे ,मस्तुद ज्ञानेश्वर ,रोहिणी गवळी तसेच सुनील बनसोडे आनंद बनसोडे संदीप बनसोडे हे बँकेतील आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत.शाखाधिकारी अशीष शेळके यांच्या अध्यक्षतेखाली सर्व कामकाज कोणताही अनुचित प्रकार न घडता आलेल्या सर्व लाभार्थ्यांना व्यवस्थित माहिती सांगून गरज पडेल त्यांना माहिती देऊन हे मानधन वाटप करण्यात आले.मानधन संदर्भात ज्या लाभार्थ्यांना अडचण आहे त्यांना सर्व कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित माहिती देऊन बँकेचे कामकाज केल्याने. महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील सर्व कर्मचाऱ्यांचे सर्व लाभार्थ्यांनी कौतुक व अभिनंदन केले.

 
Top