धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूल येथील इयत्ता 7 वी मधील कु. मयुरेश महेश स्वामी याने 14वर्ष वयोगटात शालेय तालुकास्तर बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. तर जिल्ह्यस्तरीय बुद्धिबळ  स्पर्धेसाठी पात्र झाल्याने  तालुका क्रीडा संयोजक  बिभीषण पाटील, भोसले हायस्कूलचे क्रिडा शिक्षक आर.पी. पवार  व प्रा. अमित लोमटे तसेच जिल्हा आर्बिटर भोरे, डॉ.बुर्ले व भालेकर सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, सरचिटणीस प्रेमाताई पाटील, कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील व प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम व पर्यवेक्षक यशवंत इंगळे, श्रीमती बी.बी गुंड, सुनील कोरडे, राजेंद्र जाधव, धनंजय देशमुख, एन. एन. गोरे, प्रा. विनोद आंबेवाडीकर  यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top