धाराशिव (प्रतिनिधी)- श्रीपतराव भोसले हायस्कूल मधील इयत्ता पाचवी विभागामध्ये नागपंचमी सणाचे औचित्य  साधून कार्यानुभव विषय शिक्षिका सौ.पी.डी. परतापुरे  यांच्या मार्गदर्शनाखाली मेहंदी स्पर्धा घेण्यात आली.  या मेहंदी स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवीच्या  वर्गातील 180 मुलींनी  उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या मेहंदी स्पर्धेमध्ये सर्व मुलींनी  एकमेकींच्या हातावर आकर्षक मेहंदी रेखाटन केले.

या स्पर्धा सुरू असतानाच प्रशालेचे प्राचार्य एन.आर. नन्नवरे, उपप्राचार्य आदरणीय एस.के घार्गे, उपमुख्यध्यापक कदम पाचवी विभागाचे पर्यवेक्षक डी.ए. देशमुख  या सर्व मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. सर्व विद्यार्थीनींचे भरभरून कौतुक केले व पुढील होणाऱ्या सर्व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. पाचवी विभागाचे कामकाज पाहून सर्व मांन्यवरांनी समाधान व्यक्त केले.

या मेहंदी स्पर्धा उत्साहात पार पडण्यासाठी पाचवी विभागातील पी.डी. परतापुरे यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच लोकरे, पी.पी. मैत्रे, गायकवाड, व्ही. एल. पवार, बिरगड, राऊत  या सर्व महिला शिक्षिकांनी स्पर्धा पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. व आनंददायी वातावरणात स्पर्धा संपन्न झाली.

 
Top