परांडा (प्रतिनिधी) - येथील जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी व आण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. प्रथम प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी लोकमान्य टिळक व अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.
या आयोजित स्पर्धेत हुमेरा पठाण, श्रावणी शिंदे, सिद्दीका चौधरी, फातेमा शेख, आदिती पोळके, सानिया पठाण,पोर्णिमा सिरसकर, सुहाना मुजावर, फातेमा मुजावर सानिका निकाळजे ,पल्लवी माने, राधिका बहिरे, गौसिया, शेख, सानिका कोळेकर यांनी निबंध स्पर्धेत भाग घेतला याच मुलींनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या विषयी भाषणे केलीफ तसेच शुभांगी देशमुख,आबासाहेब माळी, भाऊसाहेब सुर्यवंशी, मुख्याध्यापक दिनकर पवार यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळक व आण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल स्विस्तर माहिती सांगितली. प्रशालेची विद्यार्थीनी पोर्णिमा सिरसकर हिने सूत्रसंचालन केले व विद्यार्थीनी सुहाना मुजावर हिने आभार प्रदर्शन केले.