धाराशिव (प्रतिनिधी)- तुळजापूर विकास आराखडय़ाबाबत आज तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकाऱी डॉ. सचिन ओम्बासे यांच्याशी चर्चा करण्यासाठी  धाराशिव जिल्ह्य़ाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी निवास येथे बैठक नियोजित केले होती. पुजारी मंडळाचे मागणीला खासदार ओमराजे यांनी तुळजापूर शहराचा विकास हा सर्वांगिण व्हावा यावर प्रशासनाने भर द्यावा असे सांगितले. 

तुळजापूर शहरामध्ये प्रत्येक भागामध्ये समान विकास होणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले. या बैठकीला विपीन शिदे, धिरज पाटील, अनंत कोंडो, रूशीकेश मगर, अमोल कुतवळ, अमर परमेश्वर, श्याम पवार, सुधीर परमेश्वर, प्रविण कदम, राहुल खपले, भाऊ भांजी, सचिन अमृतराव, लालासाहेब मगर, राजाभाऊ चोपदार, आण्णासाहेब क्षीरसागर, नवनाथ जगताप, बल्लर कदम, अमोल जाधव, मुन्ना धुमाळ, श्रीराम अपसिंगेकर व इतर उपस्थित होते. यावेळेस जिल्हाधिकारी यांनी तुळजापूर मधील कुठल्याही घटकांवर अन्याय होणार नाही याची ग्वाही दिली.

 
Top