धाराशिव (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील रांजणी येथील नवनाथ भागोजी सौदागर वय 58 यांचे अल्प आजाराने धाराशिव शहरात एका खाजगी रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्यावर मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी दहा वाजता रांजणी येथे सौदागर यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. नवनाथ सौदागर यांच्या मागे पत्नी, तीन भाऊ, दोन विवाहित मुली, दोन मुले, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. नवनाथ सौदागर यांनी रांजनी येथील एन साई शुगर त्याचप्रमाणे धाराशिव साखर कारखाना चोराखळी येथे काम केले होते.

 
Top