धाराशिव (प्रतिनिधी)- पुण्य श्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चोराखळी या आजोळ ग्रामी पवित्र श्री क्षेत्र पापनाश मंदिरात श्रावण महिन्यात येवून प्रा.लक्ष्मण हाके यांनी दर्शन घेतले. तसेच समाज बांधवां सोबत चर्चा आणि मार्गदर्शन केले असून एकूण आजची वस्तुस्थिती विषद केली त्याच प्रमाणे चोराखळी विकासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची हमी दिली.
या वेळी प्रा. लक्ष्मणराव हाके यांचे चोराखळी येथे स्वागत श्री क्षेत्र पापनाश देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दिगंबर साहेबराव मैंदाड, अशोक मैंदाड यांनी केले. यावेळी माजी सरपंच खंडेराव मैंदाड, ॲड. श्रीकांत मैंदाड, ॲड. मीराजी मैंदाड, चंद्रकांत कोकाटे श्रावण इटकर, तुळशीदास मैंदाड, सुभाष मैंदाड, श्याम साचणे, राजीव मैंदाड, बाळासाहेब मैंदाड, विष्णू मैंदाड, प्रभाकर मैंदाड आदीसह विश्वस्त मंडळासह गावकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.