धाराशिव (प्रतिनिधी)- काँग्रेस कमिटीच्या धाराशिव तालुकाध्यक्षपदी काँग्रेसचे निष्ठावंत विनोद जीवनराव वीर यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशानुसार पक्षाचे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी ही निवड घोषित केली आहे. या निवडीचे पत्र नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते देण्यात आले. सदरील निवडीचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. धीरज कदम-पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे. 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख यांच्यानंतर माजी मंत्री आ.अमित(भैय्या) देशमुख, आ.धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहोत. तालुकाध्यक्षपदी निवडीने या कार्याची पावती आपणास पक्षाकडून मिळाली असून यापुढेही मोठ्या उमेदीने आणि ताकदीने काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी आपण काम करणार असल्याचे निवडीनंतर नूतन तालुकाध्यक्ष विनोद वीर यांनी सांगितले.

 
Top