कळंब (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भाटशिरपुरा ता.कळंब या शाळेचे मुख्याध्यापक बाळकृष्ण व्यंकटराव तांबारे  यांनी  निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आणि प्राथमिक शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता  निर्मितीमध्ये अनमोल शैक्षणिक कार्य केल्याबद्दल जिल्हाप्रशासनाच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

मंगळवार दि.27 आँगस्ट रोजी सामाजिक न्याय भवन धाराशिव या ठीकाणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिव यांच्या वतीने  मुख्यकार्यकारी अधिकारी डाँ. मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हा गुणवत्ता कक्ष व जिल्हा सुकाणू समितीच्या जिल्हास्तरीय बैठकीत अप्पर पोलीस अधिक्षक गौहर हसन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन बाळकृष्ण तांबारे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था धाराशिवचे प्राचार्य डाँ.दयानंद जटणूरे, शिक्षणाधिकारी प्रा. अशोक पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक सुधा साळुंके, पोलीस उपनिरिक्षक अनघा गोडगे, वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. शोभा मिसाळ, डॉ. जमादार  प्रा.सुचित्रा जाधव, प्रा.शरिफ शेख, प्रा.अघोर हे मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे  गटशिक्षणाधिकारी, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख  गुणवत्ता कक्षातील सर्व अधिकारी पदाधिकारी व विषय साधन व्यक्ती उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. अंजली सुर्यवंशी यांनी तर  सुत्रसंचलन शिक्षणविस्तार अधिकारी दत्तप्रसाद जंगम यांनी केले. तर आभार शिक्षणविस्तार अधिकारी बालाजी यरमुनवाड यांनी मानले.


 
Top