धाराशिव (प्रतिनिधी)- अखिल भारतीय शिव उद्योग सहकार सेना महासंघाच्या धाराशिव जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुखपदी सौ.सुवर्णाताई पाटील यांची निवड करण्यात आली. तर जिल्हा उपाध्यक्षपदी श्री.कैलास प्रल्हाद शिंदे, धाराशिव तालुका उपाध्यक्षपदी महेश गणपत बनसोडे (माळी) यांची निवड करण्यात आली.

हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. धाराशिव येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, शिवउद्योग सहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील (आप्पा) शेरखाने, मागासवर्गीय विभागचे जिल्हाध्यक्ष अमित बनसोडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र नूतन पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन शिवसेना पक्षाची ध्येयधोरणे, विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचवून पक्ष संघटन वाढवावे असे यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. कार्यक्रमाला धाराशिव शहरातील शिवसैनिक उपस्थित होते.

 
Top