धाराशिव (प्रतिनिधी)- 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आळणी तालुका धाराशिव येथे प्रभातफेरी काढण्यात आली. प्रभातफेरीत देशभक्तीपर घोषणा देण्यात आल्या तसेच शाळेत विविध गुण दर्शन कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये भाषणे देशभक्तीपर गीताचा समावेश होता तसेच देशभक्ती पर गीतावर बहारदार नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले प्रारंभी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून ध्वजारोहण सन 2023-2024 च्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केल्याबद्दल व गुणवत्ता धारक झाल्याबद्दल इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी ईश्वरी गणेश निंबाळकर व प्रतीक पद्माकर नांदे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिवनेरी मित्र मंडळ होळी चौक अळणी यांचे अध्यक्ष श्री प्रसाद वीर व मित्रमंडळामार्फत गाव स्तरावर आयोजित विविध स्पर्धाच्या विजेत्या विद्यार्थ्यांना  आकर्षक ट्रॉफी व 1000 रुपये रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. कार्यक्रच्या अध्यक्ष स्थानी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री नांदे विजयकुमार होते व प्रमुख पाहुणे म्हणून  उप सरपंच कृष्णा गाडे तसेच पोलीस निरीक्षक गडचिरोली श्री शुभम म्हेत्रे व शहाजी गाडे होते.

 प्रास्ताविकमध्ये मुख्याध्यापक श्री बशीर तांबोळी यांनी शाळेतील विविध उपक्रम व गुणवत्ता वाढीसाठी विविध स्पर्धेत्मक परीक्षेद्वारे सर्व शिक्षक प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री अक्षय कदम, संजीवनी पौळ,सुनील काळे, उपाध्यक्ष अफसाना शेख,श्री चंद्रशेखर वीर विकास पाटील, संदीपान माळकर तात्यासाहेब वीर,वैभव तोडकर, राजेंद्र कदम,विशाल वीर, अच्युत साळुंके, सुधीर वीर, किरण कोळी सुहास थोरात, किरण वीर, अण्णासाहेब राऊत,प्रसाद वीर,पोपट सुरवसे,गणेश निंबाळकर, निलेश निंबाळकर,हनुमंत तांबे,धनंजय वीर, शिला तौर, हनुमंत तौर,पद्माकर नांदे, हनुमंत कांबळे,शिवलिंग चौगुले, सुहाना मुलानी,उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक श्री दिनेश पेठे उत्तम काळे डोंगरे मॅडम कराड मॅडम नरवते मॅडम मते मॅडम ढगे मॅडम म्हेत्रे मॅडम वीर मॅडम श्री माने सर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. सत्यशीला म्हेत्रे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीम. वर्ष्या डोंगरे यांनी केले.कै. अभिषेक सुनील शिंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरानानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले.

 
Top