धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी तालुका तुळजापूर या शाळेतील एटीएस (राष्ट्रीय प्रज्ञा शोध) परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते आठवी परीक्षेत एकूण 26 विद्यार्थी बसवण्यात आले होते. त्यातील सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
तर हावळे अक्षय राजेंद्र, हावळे संग्राम अतुल, गायकवाड आर्या राहुल, जानराव सिद्धी रणजित, हावळे गणेश शशिकांत, जानराव श्रवीण नितीन, जाणाराव वेदांत विकी, हावळे ओम नेताजी, गायकवाड हर्षल राहुल, जानराव रेवांश रंजित हे एकूण अकरा विद्यार्थी विशेष प्रविण्यासाह उत्तीर्ण झाले आहेत. सदर यशस्वी विद्यार्थ्यांचे सन्मान चिन्ह देऊन शाळेचे मुख्याध्यापक प्रेमनाथ कांबळे व सर्व शिक्षकांच्या हस्ते 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्य दिनी सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. येथे इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एटीएसई या परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना शिवाजीराव साखरे, श्रीमती अनिशा कदम, श्रीमती राजर्षी कदम, श्रीमती सरोज जाधव, श्री उत्तम राठोड यांनी या विद्यार्थ्यांना अध्यापन केले व परीक्षेसाठी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी मेहरुणीस्सा इनामदार, विस्तार अधिकारी ग्रामीण बिट तुळजापूर मल्लिनाथ काळे , केंद्र प्रमुख राजशेखर कट्टे, बोरीचे सरपंच श्रीकांत जानराव, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश जानराव यांनी अभिनंदन केले. तसेच बोरी गावात सर्वत्र कौतुक होत आहे.